लोकगर्जनान्यूज
बीड : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातील धारुर येथील लेकीची निवड झाली. या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
बीड जिल्हा अन् त्यातील धारुर तालुका म्हणजे डोंगरी भागाचा तालुका. परंतु आता या तालुक्यालाही जागृती तिवारी या लेकीमुळे वेगळी ओळख मिळाली आहे. त्याचे कारणही खास असून आपल्याकडे क्रिकेट याच एका खेळाचे वेड आहे. परंतु आता बीड जिल्हा कुस्ती, बॉडी बिल्डिंग, स्टिपलचेस खेळात खेळाडूंनी वेगळी ओळख निर्माण केली. आता जागृती तिवारी मुळे नेमबाजी स्पर्धेतूनही राज्यात ओळख निर्माण झाली. जागृतीची एअर पिस्तूल सबयुथ गटांमध्ये महाराष्ट्र संघात निवड झाली. येत्या १८ ते २९ ऑगस्ट या दरम्यान अहमदाबाद ( गुजरात ) येथे नेमबाजी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये गुजरात, महाराष्ट्रा सह गोवा, मध्यप्रदेश, दिव-दमण इतर राज्यातील १ हजार ८०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने जागृती तिवारीचे अभिनंदन केले जात आहे.