राजमाचा वाण बदललं की,दरही बदलतो; केज तालुक्यातील शेतकऱ्याने घेतले 1 लाख 38 उत्पन्न

लोकगर्जनान्यूज
केज : राजमा ( घेवडा ) याचं वाण बदललं की, दरही बदलत असून, नाव्होली ( ता. केज ) येथील शेतकऱ्यांने तानजानीया हे राजमा वाणाचे पीक घेतले. यास महिना दीड महिन्यापूर्वी बाजारात 9 हजार 900 असा दर मिळाला. 50 गुंठ्यांत 14 क्विंटल इतके उत्पादन मिळाले तर आर्थिक उत्पन्न 1 लाख 38 हजार झाल्याचे शेतकरी ईश्वर बिक्कड यांनी लोकगर्जनान्यूजशी बोलताना माहिती दिली.
सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी दर घसरल्यामुळे चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर मागील वर्षीचे सोयाबीन अद्याप विकलेले नाही. त्यात यावर्षीच्या उत्पन्नाची भर पडली. विकावे तर दर नाही अन् नाही विकावे तर किती दिवस घरात ठेवणार? कापूस उत्पादक शेतऱ्यांची हीच कहाणी. घरातच मालाची थप्पी असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कांदाही घसरला असून शासनाने प्रतिक्विंटल 300 अनुदानाची घोषणा केली, परंतु अद्याप अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही, ही मदत मिळेल तेव्हा खरी, या काळात राजमा उत्पादक शेतकरी मजेत दिसत असून राजमाने शेतकऱ्यांच्या घामाचा योग्य मोबदला दिला आहे. मागे आडस ( ता. केज ) येथील शेतकऱ्याला 50 गुंठ्यांत ( वरुण वाण ) 1 लाख 8 हजारांचे उत्पन्न झाले. तर आता नाव्होली ( ता. केज ) येथील शेतकरी ईश्वर बिक्कड यांनीही 50 गुंठ्यांत राजमा पीक घेतलं. परंतु यांनी तानजानीया हे वाण घेतले आहे. राजमा मध्ये वाण बदललं की, दर बदलतात. आपल्याकडे असणारे वाण वरुण सध्या दर 5800/6100, वाघा 9000, डायमंड 11500, ताजानीया बिक्कड यांना महिना दीड महिन्यापूर्वी विकला तेव्हा तानजानीया वाणाला 9900 असा समाधान कारक दर मिळाला. एकूण 14 क्विंटल राजमा झाला. यातून 1 लाख 38 हजार इतके आर्थिक उत्पन्न मिळाले. हे पीक केवळ दोन महिन्यांत हाती पडते . यामुळे सध्या राजमा उत्पादक शेतकरी समाधानी दिसत असून राजमा शेतकऱ्यांना ‘राजा’ करणार अशी चर्चा सुरू आहे.
याला आपल्याकडे वाघा म्हणतात
तानजानीया या राजमा वाणाला वाघा म्हटले जाते . आपल्याकडील बहुतेक शेतकरी वाघा वरुण या दोन वाणांचे उत्पादन घेतात.