राजकारणात कोणी कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंडे, भुजबळ, पंडित, सोळंके सभेत काय बोलले?
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्याने आज ताकद दाखवून दिली असून समाजकारण अन् राजकारणाची सांगड घालायची बीडकरां कडून शिकण्यासारखी आहे. येथील जनता जे ठरवते ते करुनच दाखवते म्हणत मी आर्शिवाद घेण्यासाठी आलो असल्याचे म्हणत राजकारणात कोणी कोणाचा कायम मित्र अथवा शत्रू नसतो असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथील सभेत रविवारी ( दि. २७ ) केले.
शरद पवार यांची सभा झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने येथे सभेचे आयोजन केले. या सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री व म्हत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली. थोरल्या पवारांच्या सभेनंतर धाकट्या पवारांची सभा होत असल्याने या सभेत अजित पवार काय बोलणार? याकडे बीड जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले होते ते रविवारी सभेत बोलताना म्हणाले की, आम्ही महायुतीत पदे घेऊन मिरवण्यासाठी नव्हे तर जनतेच्या भल्यासाठी आलो आहोत. राजकारणात एकसमान दिवस कधीच नसतात त्यामुळे येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाऊन पुढे चालायचे असते. आम्ही आमचं काम कृतीतून दाखवून देणार आहोत. राज्य आपलं असून सलोखा कायम ठेवा असे आवाहन करत बीड जिल्ह्याचा पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पीकविमा विषयी बोलत शेतकऱ्यांना १ रुपयात विमा कवच दिल्याचे सांगत राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली.
सन्मानाची, दुष्काळ कायम मिटवण्याची सभा–कृषी मंत्री धनंजय मुंडे
उत्तराची सभा नाही तर उत्तरदायीत्वाची सभा आहे. दादा आपण जिल्ह्याच्या विकासासाठी वादा करावा… ही बीडकरांची अपेक्षा आहे. तुम्ही मनात आणलं तर बीड जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा मिटून जाईल. जिल्ह्यातील जेवढे धरणं असतील त्या सर्व धरणांमध्ये पाणी उपलब्ध करा.सरकारच्या तिजाेरीमधील निधी काही अधिकचा बीड जिल्ह्यासाठी द्यावा जिल्ह्यातील माय-बाप जणता आपल्याला कधीच विसरणार नाहीत, माय-बाप जनता उत्तरदायीत्व विसणार नाही हे स्पष्टपणे सांगताे. स्व. मुंडे साहेबांच्या हाताला धरुन संघर्ष केला. मात्र २००६ मध्ये मला भाजपामधून काढलं गेलं. नंतर विधानसभेच्या आज मी जाे घडलाे आहे तर ते दादानी मला घडलं म्हणून मी आज उभा आहे. म्हणून मी अजीत दादांचे उत्तरदायीत्वासाठी उभा राहिलाे हे चुकलं का ? प्रश्नासाठी संघर्ष कसा करायचा, प्रश्न कसा साेडायचा हा माझा संघर्ष आहे, हा माझा इितहास आहे. माझ्या पाचवीला संघर्ष बुजला आहे, आज मी कृषीमंत्री आहे पण या किती अडचणी आहेत ते मांडणार नाही पण राज्यात अभिमान वाटावं असे काम शेतकऱ्यांसाठी करुन दाखवणार आहे.
विकासासाठी आम्ही अजितदादा यांच्या बरोबर-ना. छगन भुजबळ
आम्हाला २०१४ पासून हा रस्ता कोणी दाखवला ? तो शरद पवारांनीच दाखवला. आपल्याच खेळाडूची विकेट काढायची असते का? हा छगन भुजबळ इडीला घाबरला नाही, जेलमध्ये गेला, पण शरद पवारांसोबतच उभा राहिला. ९१ पासून उभा राहिला, तरिही मला घाबरुन तिकडे गेला असं कसं म्हणता ? आमचं काय चुकलंय? कशासाठी आमच्यावर हल्ले करता? आता विकासासाठी आम्ही अजितदादा यांच्या बरोबर उभे राहिलो आहोत.
बारामतीप्रमाणे विकास करावा – आ. प्रकाश साेळंके
बीड जिल्ह्याचा दुष्काळ संपला पाहिजे. जिल्ह्यातील उद्याेग-व्यवसायाला पाेषक वातावरण मिळाले पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक एमआयडीसी बळकट हाेण्यासाठी इतर राज्यांमधील उद्याेग बीड जिल्ह्यात आली पाहिजेत. जिल्ह्यात विकासाचे चित्र रेखाडले पाहिजेत. राज्यामध्ये विकासाची बारामती म्हणून ओळखली जाते त्यानुसार बीड जिल्ह्यातही विकास झाला पाहिजे.
साहेब देव्हाऱ्यातील फोटो कसा काढु-अमरसिंह पंडित
बीड जिल्ह्यातील दुष्काळाचा प्रश्न संपला पाहिजे. पाणी टंचाईचा माेठा प्रश्न आहे. गेवराई तालुक्यात जे जलसंपदेचे काम दादा यांच्या पाठपुराव्यामुळे झालेले आहेत त्यातून तालुक्यातील शेती पाणीदार झाली आहे. तरीही संपूर्ण बीड जिल्हा पाणीदार-दुष्काळमुक्त हाेणं अवश्यक आहे .आम्ही किती दिवस सांगायचं की आमचा बीड जिल्हा ऊसताेड कामगारांचा आहे. गेवराईतील सिंदफणेत सात बॅरेगेज निर्माण झाल्यास पाणी स्त्राेत बळकट हाेतील. याचा फायदा पाटाेदा तालुक्यासह, गेवराई, माजलगाव, परळी तालुक्यातील शेतीला हाेईल. साहेब अम्ही तुमचे फाेटाे लावू नका सांगत आहेत, अम्ही लावणार नाहीत पण तुमच्या संस्कार कसे काढून घेणार, आमच्या परिवाराच्या घरातील देव्हाऱ्यामधील तुमचा फाेटाे कसां काय काढू शकणार पण साहेब आम्ही विकासासाठी दादासाठी साेबत राहण्याचं ठरलं.