रविकांत ठोंबरे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड
लोकगर्जनान्यूज
बीड जिल्हा कृषी खाते कर्मचारी पतसंस्था लि. बीडच्या चेअरमनपदी आडस येथे कार्यरत कृषी पर्यवेक्षक रविकांत ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
बीड जिल्हा कृषी खाते कर्मचारी पतसंस्था लि.बीड या संस्थेच्या संचालक मंडळ निवडीसाठी मागील १० दिवसांपूर्वी मतदान झाले. या अटीतटीच्या निवडणुकीत रविकांत बाबासाहेब ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील कृषी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळविला. शुक्रवारी ( दि. २१ ) चेअरमन निवडीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सर्वानुमते रविकांत ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात येत आहे. रविकांत ठोंबरे हे आडस कृषी मंडळ अधिकारी कार्यालय येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. यामुळे त्यांचे आडस परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.