‘या’ पोलीस ठाण्यातील फौजदार व जमादार एसीबीच्या जाळ्यात;बीड पोलीस दलात खळबळ

लोकगर्जनान्यूज
बीड : विनयभंग गुन्हा प्रकरणी सहकार्य करण्यासाठी ३० हजार लाचेची मागणी केली. त्यातील १५ हजार रु. बसस्थानका समोरील एका हॉटेलमध्ये स्वीकारताना एक पोलीस उपनिरीक्षक व एक जमादार असे दोघे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सदरील कारवाई औरंगाबाद एसीबी पथकाने सोमवारी रात्री ८ च्या सुमारास बीड बसस्थानक समोरील उडपी हॉटेलमध्ये केली.
राजू भानुदास गायकवाड ( पोलीस उपनिरीक्षक ), विकास सर्जेराव यमगर ( जमादार ) असे लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या लोकसेवकांची नावं आहेत. शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असून, येथे दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला सहकार्य करण्यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी केली. यापुर्वीच १० हजार रुपये घेतले होते. काल सोमवारी १५ हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी सदरील व्यक्तीने एसीबी कडे तक्रार केली. त्यावरून लाचेचा सापळा लावण्यात आला. शहरातील बसस्थानक समोरील एका हॉटेलमध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सदरील सापळा औरंगाबाद एसीबी पथकाने यशस्वी केला. या घटनेने बीड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.