कृषी

यावर्षी उत्पादन घटल्याने ऊसाचा गोडवा झाला कमी

४० टक्के उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका

लोकगर्जनान्यूज

माळेगाव : केज तालुक्यातील माळेगाव परिसरात सध्या ऊस तोडणी (हंगाम २०२२-२३ ) जोरदारपणे सुरू आहे. या वर्षी पावसाचा अनियमितपणा,अचानक हवामानात झालेले बदल,मागील हंगामात उशिरा झालेली तोडणी तसेच हुमणी,मावा,तांबेरा,मर रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे ऊसाची अपेक्षित वाढ झाली नाही.ऊसाची जाडीही वाढली नाही परिणामी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकरी ४० टक्के इतकी ऊस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून पिकांच्या सततच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

ऊस हे नगदी आणि भरवासाचे पीक म्हणून ओळखले जाते.मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी ऊस लागवडीकडे वळला मात्र इथेही संकटं शेतकऱ्यांची पाठ सोडत नाहीत. कधी पावसाचा खंड,कधी अतिवृष्टी,सतत वातावरणातील बदलामुळे उसाच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले नाही.याशिवाय विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यात आणखी भर म्हणजे रानडुकरांचा नेहमीचा उच्छाद,अशा अनेक प्रकारचे संकटांची मालिका निर्माण झाल्याने यावर्षी उसाच्या उत्पादनात कमालीची घट होत आहे .याचा परिणाम साखर उताऱ्यावर होणार असल्याने त्याचा ऊस दरावरही प्रभाव पडतो त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
यावर्षी ऊसतोड विनासायास वेळेत होत असल्याने शेतकरी समाधानी असले तरी वेळच्या वेळी पाणी दिले,महागडी खतांची मात्रा दिली,औषधे फवारणी ,वेळोवेळी मशागत केली तरी एकूण उत्पन्नात होणारी घट चिंता वाढवणारी आहे.
*परिसरात या कारखान्यांच्या आहेत तोड यंत्रणा
केज-कळंब भागातील सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम व्यवस्थित सुरू आहे.
येडेश्वरी साखर कारखाना युनिट १ सारणी आ.,
गंगामाऊली शुगर. उमरी केज. या दोन कारखान्यांची मोठ्या प्रमाणावर तोड यंत्रणा कार्यरत असल्याने इकडे जास्त ऊस गळपास जात आहे. तर आंबासाखर वाघाळा.या शिवाय जिल्हा बाहेरील भैरवनाथ शुगर वाशी,डिडिएन हावरगाव ,यांच्याही कारखान्यास कमी प्रमाणात का होईना टोळ्या दाखल झाल्या आहेत.परिसरातील उपलब्ध ऊसक्षेत्रा पैकी पन्नास टक्के क्षेत्रातील ऊसाचे गाळप झाले आहे. यामुळे यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न नाही.
आता कारखाने ऊस दर किती देतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकरी म्हणतात
“माझ्या तीन एकर क्षेत्रात मागील वर्षी १८० टन ऊस निघाला होता.यावर्षी गेल्यावर्षी इतकेच पाणी देऊन खत टाकून जास्त खर्च करून सुध्दा तीन एकरमध्ये केवळ १०० टन ऊसाचा उतारा आला आहे.ऊस उत्पादनामध्ये मोठी घट झाल्यामुळे मोठे आर्थीक नुकसान सहन करावे लागत आहे. ” लक्ष्मण देवकर
ऊस उत्पादक शेतकरी,माळेगाव ( ता. केज )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »