आपला जिल्हाकृषी

यंदा खरीप हंगामात राजमाचे क्षेत्र वाढले

हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठी घट;गहू, ज्वारी घरी खाण्यापूर्तीच

लोकगर्जनान्यूज

बीड : खरीप पाठोपाठ शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातही पारंपारिक पिकांना फाटा देत राजमाला पसंती दिली असल्याचे दिसत असून, यंदा राजमाचे क्षेत्र वाढल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. याचा परिणाम हारभऱ्यावर झाला आहे. तर गहू, ज्वारी या शेतकऱ्यांच्या धान्याला भाव मिळत नसल्याने याची पेरणी शेतकरी घरी खाण्यापूर्तीच करीत आहेत.

खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांची पिके घेण्याचे ठरलेले असायचे, खरीप हंगामात शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस लागवड करीत असे, जनावरे असली तर हायब्रीड, बाजरी, तूर, मूग, उडीद, तीळ अशी विविध पिके घेत असे. पण बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांच्या गोठ्यातील दावणी नष्ट झाल्या, यंत्राने सर्व कामे होत असल्याने जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांनी बंद केले. यामुळे हायब्रीड, पिवळे ही पिके जवळपास संपूष्टा आली. बाजरीचे क्षेत्र काही भागात दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे वाढला आहे. यामुळे खरीपात कापूस आणि सोयाबीनचा पेरा वाढला, यात आता कापूस मागे पडले असून खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख पीक झाले. या पाठोपाठ रब्बी हंगामातही आता शेतकरी पीक बदल करीत आहेत. आगोदर रब्बी हंगाम म्हटलं की, गहू, ज्वारी, बाजरी, करडई असे पीक घेत असत. मेहनत कमी, पाणी कमी लागत असल्याने शेतकऱ्यांचा कल हरभऱ्याकडे असे यामुळे रब्बी हंगामात जास्त पेरा होत असल्याने हरभरा हा प्रमुख पीक समजला जायचा, परंतु येथेही आता शेतकऱ्यांची आवड बदलली आहे. रब्बी हंगामात प्रथमच हरभरा पिकाला मागे सारुन राजमा पेरणीत पुढे सरकला आहे. हरभऱ्या पेक्षा जास्त मेहनत, जास्त पाणी लागते तरीही शेतकरी राजमा पेरणी करीत आहेत. यामुळे यंदा जिल्हाभरात कानोसा घेतला तर राजमाचा पेरणीचा टक्का वाढल्याचा दिसून येत आहे. विशेष म्हणजे राजमाला चांगली मागणी असून बाजारात दर ही चांगला मिळत आहे. बरेच दिवस शेतकरी राजमा साठवून ठेवू शकतात ही जमेची बाजू आहे. तर करडईचे प्रमाण खूप घटले असून, शेतकरी गहू आणि ज्वारीची पेरणी घरी खाण्यापूर्ते धान्य निघावे याच हिशोबाने करताना दिसत आहेत.

ऑस्ट्रेलिया येथून हरभरा आयात केल्याने भाव पडण्याची भीती!

शासनाने सोयाबीन ११ हजार रुपयांपर्यंत गेले की, परदेशातून सोया पेंड, खाद्यतेल आयात केले. आयात शुल्क कमी केले, याचा परिणाम सोयाबीन दरावर झाला असून सध्या देशात सोयाबीन ४ हजार प्रतिक्विंटल विकला जात आहे. कांदा वाढला की, पाकिस्तान मधून आयात होतो, टोमॅटो वाढला की, अफगाणिस्तान मधून मागविला जातो यामुळे दर पडतात. सध्या देशात हरभरा ८ ते ९ हजार प्रतिक्विंटल विक्री दर आहे. शासनाने हरभरा ऑस्ट्रेलिया येथून आयात केला आहे. यामुळे देशातील हरभऱ्याचे भाव पडणार यामुळे शेतकरी राजमाकडे वळला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच मेहनत आणि पाणी कमी लागत असलं तरी हरभरा जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही. मिळेल त्या दरात तो विकावा लागतो यामुळे शेतकरी मेहनत, पाणी जास्त लागत असला तरी उत्पादन जास्त आणि बरेच दिवस साठवून ठेवता येत असल्याने राजमाकडे वळला आहे अशी चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »