यंदाचा दिवाळी पाडवा पवार कुटुंब बीडमध्ये साजरा करणार
आ.रोहित पवार, आ.संदीप क्षीरसागर कुटुंबियांसह उपस्थित राहणार
लोकगर्जनान्यूज
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आ.रोहित पवार व कुटुंब यंदाचा दिवाळी पाडवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बीड मध्ये साजरा करणार आहे. यासाठी मंगळवार (दि. १४ नोव्हेंबर) रोजी बीड येथील राष्ट्रवादी भवन येथे स्नेहमिलन व पानसुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याच्या राजकीय गोंधळ सुरु असलेल्या काळात आपल्या एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांसोबत दिवाळीचा सण आनंदाने साजरा करून त्या निमित्ताने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या अडचणी व विविध विषयांवर मुक्त संवाद साधून त्यांच्याशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा मानस असून या कार्यक्रमास मंगळवार (दि.१४ नोव्हेंबर ) रोजी बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे सकाळी ११ वा. बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.