म्हत्वाचे अपडेट: पोलीस भरती प्रक्रियेत झालेत काही बदल!

लोकगर्जनान्यूज
राज्य सरकारने पोलीस दलात मोठी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. यासाठी अनेक तरुण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरत आहेत. परंतु सर्व्हर मुळे अडचणीचा सामना करावा लागतो आहे. परंतु अर्ज दाखल करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढ दिली असल्याने दिलासा मिळाला आहे. तसेच या भरती प्रक्रियेत काही म्हत्वाचे बदल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने बऱ्याच वर्षांनी पोलीस भरती सुरू केली. यामुळे पोलीस बनण्याची स्वप्न पाहून तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई १४ हजार ९५६, पोलीस वाहन चालक २ हजार १७४, सशस्त्र राज्य राखीव दल १ हजार २१० अशी पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुदत संपण्याची ३० नोव्हेंबर तारीख जवळ आली तर सर्व्हर चालत नसल्याने अनेकांचे अर्ज भरले गेले नाहीत. काहींच्या त्रुटी आहेत. यासह आदी तक्रारी आहेत. यामुळे पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर काल राज्य शासनाने १५ दिवसांची मुदत वाढ दिली. यामुळे अनेक भावी पोलीस तरुणांचा जीव भांड्यात पडला आहे. परंतु भरती प्रक्रियेत काही बदल करण्यात आल्याचे अपडेट बीबीसी मराठीने दिले आहे. त्यानुसार लेखी परिक्षेसाठी उमेदवारास ९० मिनिटांचा वेळ दिला जाणार असून, परिक्षा मराठी भाषेत घेतली जाणार आहे. लेखी चाचणीचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्नांचा असेल, शारीरिक चाचणीत किमान ५०% गुण मिळालेले उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील, सशस्त्र राज्य राखीव दलाच्या पुरुष पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीत १०० गुणांची असणार, पोलीस शिपाई पदासाठी प्रथम शारीरिक चाचणी ५० गुणांची अन् यानंतर लेखी परीक्षा १०० गुणांची होणार असे काही म्हत्वाचे बदल झाले आहेत. पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणांनी याकडे ही लक्ष देत स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कामाला लागावे.