आपला जिल्हा

मोदी सरकारच्या काळात केवळ महागाई- मा. दानवे

आहेरचिंचोली येथे शेतकरी मेळाव्यास प्रतिसाद; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली गुड न्यूज

लोकगर्जनान्यूज

बीड : मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाले असून देशात अमुलाग्र बदल झाल्याचा गवगवा भाजप करत आहे. परंतु, गत 9 वर्षांत केवळ महागाई झाली आहे, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

आहेर चिंचोली (ता.बीड) येथे युवा नेते अजय कारांडे यांनी रविवारी (दि.4) आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यास संबोधित केले. यावेळी श्री.दानवे हे बोलत होते. व्यासपीठावर हवामान अभ्यासक पंजाब डख, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, माजी आमदार सुनील धांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, युवा मल्हार सेनेचे अध्यक्ष इंजि.विष्णू देवकते, रासपचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर, माजलगावचे युवासेना शहरप्रमुख विशाल थावरे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री.दानवे म्हणाले, गेल्या 9 वर्षात महागाईमुळे बियाणे, रासायनिक खते यांची दुप्पट भाववाढ झाली, पण त्याबदल्यात शेतमालाचे भाव वाढले नाही. तसेच लागवडीपासून ते शेत माल काढणीपर्यंत मंजुरी खर्च वाढ झाली आहे. गारपीट, अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी फक्त अतिवृष्टीची मदत जाहीर करत पोकळ घोषणा करुन वेळकाढूपणा केला. पण एकाही शेतकर्‍याच्या खात्यावर रुपया जमा झाला नाही. फक्त एसटी बसवर, टि.व्ही.वर जाहिराती करत गतिमान सरकार करत घोषणाबाजी चालू आहे, पण प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणे पुसली जात आहे. तर दुसरीकडे मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनसाठी एका बैठकीत 6,000 कोटी रुपये मंजूर होतात, पण शेतकर्‍यांसाठी फक्त घोषणा करतात. एकीकडे ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला जातो, पण आपल्या शेतकरीच्या कापूस भाव नसल्याने घरात पडलाय. शेतकरी दररोज चिंता करत आज भाव येईल, उद्या येईल अशी आशा करतोय. कांदाचेही तसेच, कांद्याला भाव नाही. शेतकर्‍यांचा कांदा सडतोय, तो अक्षरशः फेकून देतोय, भाव काय तर 2 रूपये किलो आणि तिकडे मुंबईत 40 रूपये किलोला व्यापारी विकतोय, असे हे शेतकर्‍यांचे विदारक चित्र आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकर्‍यांकडे लक्ष द्यायला तयार नाही, अशा शब्दात दानवे यांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला. शेतकरी मेळाव्याचे आयोजक युवा नेते अजय कारांडे यांच्या नियोजनाबद्दल कौतूक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय कारांडे यांनी केले. सुत्रसंचलन ज्ञानदेव काशिद यांनी केले. आभार नारायण काशिद यांनी मानले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यंदा जोरदार पाऊस-पंजाब डख
अवतीभोवतीच्या नैसर्गिक बदलावरून पावसाचा अंदाज येतो. ते बदल आपण वेळोवेळी समाजमाध्यमातून मांडत असतो. यंदा जोरदार पाऊसकाळ होणार असून बळीराजा सुखावणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी चिंता करू नये. शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी आपण वेळोवेळी अचूक अंदाज देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे हवामान अभ्यासक पंबाज डख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »