शिक्षण संस्कृती

मोठी बातमी – महाराष्ट्रात सर्व शाळांना सुट्ट्या जाहिर; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

इयत्ता 9 ,10 वी वगळता अतिरिक्त तास अथवा इतर उपक्रम राबवू नये

लोकगर्जनान्यूज

वाढती उष्णता पहाता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच शाळांना उद्या शुक्रवार ( दि. 21 ) पासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर केली. तशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.

खारघर ( मुंबई ) येथील पुरस्कार वितरण कार्यक्रमात अनेकांना उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागला. यामुळे शासन सावध पावले उचलत असून, आरोग्य विभागाने पुढील चार दिवस धोक्याचे असून, नागरिकांनी दुपारी 12 ते 3 घराच्या बाहेर न पडण्याचा सल्ला दिला. वाढती उष्णता पहाता राज्य शासनाने उद्या दि. 21 एप्रिल पासून शाळाना उन्हाळी सुट्टी जाहीर केली. याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.
9,10 वी वगळता इतर विद्यार्थ्यांना बोलावू नये
उन्हाळी सुट्टी दरम्यान काही शाळा अतिरिक्त तासिका घेतात अथवा इतर काही उपक्रम राबवितात. या शाळांनी इयत्ता 9,10 चे विद्यार्थी वगळता अतिरिक्त उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना बोलावू नये त्यांना सुट्ट्यांचा आनंद घेऊ द्यावा असेही शिक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.
शाळा याच तारखेला सुरू होणार
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना यापुर्वीच जाहीर केलेल्या विदर्भात 30 जून व इतर महाराष्ट्रात 15 जूनला शाळा सुरू होतील असे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »