मोठी बातमी! बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील घोटाळा उघड:६९ जणांवर गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
बीड : मलेरिया विभागात काम केल्याचे बोगस प्रमाणपत्र काढून आरोग्य विभागात नोकरी लाटल्याचे उघडकीस येताच ६९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या मध्ये खळबळ माजली आहे.
आरोग्य विभागात आरोग्य सेवक भरतीमध्ये मलेरिया विभागात हंगामी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांना राखीव कोटा असतो. असे बोगस प्रमाणपत्र वाटप करणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याच्या तक्रारी होत्या. याला अखेर आज आरोग्य उपसंचालक, लातूर कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी ज्ञानदेव करवर यांनी फिर्याद दिल्याने वाचा फुटली. त्यांच्या फिर्यादीवरून येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बोगस प्रमाणपत्रच्या आधारे नोकरी लाटणाऱ्या तब्बल ६९ जणांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर हे तर लहान मासे असून, मोठ्या माशांवर कधी कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.