मोठी बातमी! बस नर्मदा नदीत कोसळली; मोठ्या जिवीतहानीची शक्यता!
लोकगर्जना न्यूज
पुणे : इंदौर हून पुणे येथे येत असलेली बस नर्मदा नदीत कोसळली असल्याची घटना आज सकाळी १:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये आतापर्यंत १३ प्रवासी ठार झाले असून १५ जणांना वाचविण्यात यश आले. बचाव कार्य सुरू आहे. असे वृत्त मटाने दिलं आहे.
त्या वृत्तानुसार इंदौर येथून ४० प्रवासी घेऊन बस पुणे येथे येत होती. दरम्यान मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यांत घारगाव येथे बस आली असता ती नर्मदा नदीत कोसळली. एकच कल्लोळ झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत जवळपास १३ जणांचा मृत्यू झाला आहे. १५ जणांना वाचविण्यात यश आले. इतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच बचावासाठी एनडीआर एफचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत ६ जणांना रेस्कयू केलं आहे. हा अपघात नेमका कसा घडला, बस नदीत कशी कोसळली याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. परंतु घटना समजताच अनेकांच्या मनाचा ठोका चुकला आहे. तर प्रत्येकाच्या तोंडातून अपघातग्रस्तांचे रक्षण कर रे असे साकडे देवाकडे घातले जात आहे.