मोठी झेप घ्यायची आहे, जिल्ह्यातील तरूणांना स्ववलंबी करायचे : अर्चना कुटे
लोकगर्जनान्यूज
बीड : आपल्याला मोठी झेप घ्यायची आहे, प्रगती करायची आहे, जिल्ह्यातील बेरोगारांना स्ववलंबी बनविण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामाशी प्रामणिक राहून ग्रुपच्या प्रगतीचे साक्षीदार व्हावे, देशात आलेल्या कोरोनाकाळातील लॉकडाऊन दरम्यान कुटे ग्रुपमधील एकही कर्मचारी कमी केला नाही,अथवा त्यांचे वेतन थांबविण्यात आले नाही, उलट या कर्मचाऱ्यांचे कुटुंब व्यवस्थीत कसे चालेल याचीच काळजी ग्रुपच्या वतीने घेण्यात आली. सर्वांना बरोबर घेवून प्रगती साधायची आहे, असा विश्वास कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना सुरेश कुटे यांनी दिला.
महिला सक्षमीकरणासाठी ब्लॅकस्वान पुरस्काराने त्यांचा सन्मान झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.पुढे बोलताना अर्चना सुरेश कुटे म्हणाल्या, जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आज ग्रुपमध्ये जवळपास १५ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी काम करीत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील मुलींचाही समावेश आहे.तरूणांमधील टेलेंन्ट शोधून त्यांना आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.आणखी मोठी झेप घ्यायची आहे, त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. तिरूमला एडीबल ऑईल, तिरूमला कोकनट ऑईल, कुटे ग्रुप डेअरी, तिरूमला पशुखाद्य यासह ४९ कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. मोठी कंपनी उभा करण्याचे धाडस कोणी करत नव्हते अशा ठिकाणी कुटे ग्रुपने आंतरराष्ट्रीय कंपन्या स्थापन करून बीड जिल्ह्यातून संपूर्ण देशभरात जाळे निर्माण केले आहे. हे केवळ जिल्ह्यातील नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेचे शक्य झाले. माझ्या जिल्ह्यातील तरूणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचेही अर्चनाताई सुरेश कुटे यांनी यावेळी सांगीतले. यावेळी मास्टर आर्यन सुरेश कुटे यांच्यासह ग्रुपमधील कर्मचारी,कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औरंगाबादमध्ये उभारणार फॉर्मासिस्ट कंपनी
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद येथील शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्रामध्ये प्लॉट नं.बी.४३ येथे डी. एन. वाय. रेमिडीस्,फॉर्मासिस्ट कंपनीची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाच्या सर्व प्रक्र ीया पूर्ण झाल्या असून या ठिकाणी लागणारे जवळपास ४०० पेक्षा अधिक तरूण बीड जिल्ह्यातील बी. फॉर्मसी, डी. फॉर्मसी महाविद्यालयातून घेतले जाणार आहेत. यासाठी कॉम्पस मुलाखतीचे नियोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील तरूणांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. अर्चना सुरेश कुटे (मॅनेजिंग डायरेक्टर, कुटे ग्रुप)