मोठी जिवीतहानीची शक्यता! कार व अप्पे रिक्षाचा भीषण अपघात; केज-अंबाजोगाई रस्त्यावरील घटना
कार व अप्पे रिक्षाचा मोठा अपघात झाला असून यामध्ये मोठी जिवीतहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सदरील घटना केज-अंबाजोगाई महामार्गावर चंदनसावरगाव-होळच्या दरम्यान घडली आहे. घटनास्थळी पोलीस व रुग्णवाहिका पोचल्या आहेत.
केज-अंबाजोगाई महामार्गावर अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, वाढते अपघात पहाता वाहन चालकांमध्ये काहीसे दहशत निर्माण झाल्याचे चित्र आहे. आज गुरुवारी जवळपास एक तासापुर्वी कार व अप्पे रिक्षाचा भीषण अपघात झाला. कार रिक्षाला धडकून पलट्या खात रस्त्याच्या खाली खड्ड्यात गेली आहे. रिक्षाचे दोन तुकडे झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. यामध्ये अनेकजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असून, मोठी जिवीतहानी झाल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सविस्तर वृत्त काही वेळात