कृषी

मेव्हण्याच्या थट्टा मस्करीत घडलेली घटना बनली गावाची परंपरा यंदा विडा येथील धुळवडीला गर्दभ स्वारीचे मानकरी ठरले देशमुखांचे जावाई

 

जावई म्हटलं की, मर्जी विरूध्द काहीच नाही असा व्यक्ती, त्यांची मर्जी प्रमाणेच सरबराई होते. एक प्रकारे जावयाला सासरवाडीत तळहातावर घेतलं जातं म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु केज तालुक्यातील विडा येथे धुळवडीला जावायाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते. ही परंपरा जवळपास ९० ते ९५ वर्षांपासून गावानं जपली आहे. जशी ही परंपरा गंमतदार आहे याची कथाही तशीच गंमतीशीर आहे. धुळवडीला आलेल्या मेवहूण्याची थट्टा मस्करीत गाढवावरून मिरवणूक काढली ही घटना गावाची परंपरा बनली. यंदा धुळवडीला श्रीमंतराव देशमुख यांचे जावई अमृत धनंजय देशमुख हे ठरले आहेत.

जावयाला घोड्यावर बसवून मिरवणूक काढण्यात येते यात काही नवल नाही. परंतु जावयाला चपलांचा हार घातलेल्या गाढवावर बसवून, डिजे लावून पुर्ण गाव त्यावर ठेका धरत वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. यावर विश्वास बसत नाही ना? परंतु हे खरं असून जवळपास मागील ९० ते ९५ वर्षांपासून ही परंपरा जपली जाते. यासाठी जावई ही ना..ना..करत राजी होतात. या परंपरेची सुरवात कशी झाली त्याचीही कथा गंमतीशीर आहे. विडा हे गाव निजामशाहीतील जहागीर दरांचे गाव आहे. अंदाजे सन १९१५ साली विड्याचे आनंदराव देशमुख यांचे मेहुणे हे धुळवडीला सासरवाडी म्हणजे विडा येथे आलेले होते. जहागीर दरांचे जावई म्हणजे त्यांचा रुबाब ही तसाच व मेहुण्यांचा पाहून चाराला ही जोड नाही. या दिवशी थट्टा मस्करीत मेहुण्याची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली. ही घटना या गावाची परंपरा बनली. कोरोना काळातील लॉकडाऊनचा काळ वगळता ही परंपरा दरवर्षी विडा ग्रामस्थ जपत आहेत. यासाठी आधीच गावकरी बैठक घेऊन कोणत्या जावयाला उचलायच ठरवतात व पथके जावयाच्या शोधात निघतात. धुळवडीच्या आगोदर जावई ही पसार होतात. यावर्षीही सरपंच पटाईत सुरज, डॉ. उदय पवार, काळे चिंतामण, पटाईत तुकाराम, शेख अश्फाक, वाघमारे दिपक, अजय पटाईत यांनी श्रीमंतराव देशमुख यांचे जावई अमृत धनंजय देशमुख रा. रातरंजन ता. वैराग जि. सोलापूर केज येथील वसुंधरा बँकेचे कर्मचारी यांना गुरुवारी ( दि. १७ ) ताब्यात घेतले व गावाच्या ताब्यात दिले. आज सकाळी धुळवडी निमित्ताने अमृत देशमुख यांची गाढवावरून मिरवणूक काढली. यावेळी गावातील लहान,थोर, तरुणांनी डिजेच्या तालावर ठेका धरीत आनंद साजरा केला. ही मिरवणूक मंदिरावर गेल्यावर जावयाला मर्जी प्रमाणे व परंपरे प्रमाणे कपड्यांचा व सोन्याची अंगठी आहेर दिला. यावेळी पुर्ण गाव सहभागी होऊन आनंदात व रंगात चिंब भिजून गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »