लोकगर्जनान्यूज
बीड : तालुक्यातील मुळुकवाडी येथे पुतण्याने चुलता-चुलतीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. जखमी चुलत्याचा अखेर मृत्यू झाला असून चुलती गंभीर जखमी आहे. हल्ला करुन पुतण्या फरार झाला. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
बळीराम मसाजी निर्मळ ( वय ८० वर्ष ) असे मयत मयताचे नाव आहे तर गंभीर जखमी केसरबाई बळिराम निर्मळ ( वय ७० ) यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या दोघा पती-पत्नीवर पुतण्या रोहिदास विठ्ठल निर्मळ ( वय ५० वर्ष ) यांने आज शनिवारी ( दि. २६ ) सकाळी ७ च्या सुमारास कोयत्याने सपासप वार करुन पसार झाला. या दोन्ही वृध्द पती-पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून ग्रामस्थांनी उपचारासाठी बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे उपचारादरम्यान बळीराम मसाजी निर्मळ यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी त्यांच्या केसरबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना समजताच जिल्ह्यात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फरार आरोपीच्या शोधत पोलीस पथक रवाना झाले असल्याचे समजते.