मुंदडांची यंत्रणा परफेक्ट;विरोधकांचा होणार कार्यक्रम करेक्ट
आमदार मुंदडा यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : गावागावात मुंदडांची विकास कामे तर पोहोचलेली आहेतच. यासोबतच प्रचाराची यंत्रणाही परफेक्ट असल्याने केज मतदारसंघात विरोधकांचा कार्यक्रम करेक्ट होणार असल्याचे आजच्या आडस परिसरातील विविध गावांच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या बैठका आणि मिळालेल्या मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसून येत आहे.
महायुतीच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार आ.नमिता मुंदडा यांचा आज केज तालुक्यातील जवळबन, सावळेश्वर, वाकडी, नांदगाव, सारणी आदी गावात प्रचार दौरा होता. येथे आ.नमिता मुंदडा यांनी कॉर्नर बैठका,रॅली काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे मतदारांनी जोरदार स्वागत केले. हा प्रतिसाद व उत्साह पहाता केज मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल काय असणार हे कोणाला विचारायची गरज नाही. जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा परफेक्ट असल्याने आ.मुंदडा यांचे नाव आणि कमळ चिन्ह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचले आहे. मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांची शिदोरी आणि त्यास प्रचार यंत्रणा परफेक्ट असल्याने येथे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. यावेळी आ.नमिता मुंदडा यांनी मतदारांशी संवाद साधताना मी तुमचा प्रत्येक प्रश्न विधानसभेत उपस्थित करुन ती सोडवून घेण्यासाठी कटीबद्ध असून, मागील पाच वर्षात तुम्ही दाखविलेला विश्वास मी विकासनिधी खेचून आणून सार्थ ठरवला आहे. यापुढेही सेवा करण्याची संधी द्यी असे म्हणत येत्या २० तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आशीर्वाद द्या असे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.