आपला जिल्हा
मा.मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा अपघात
लोकगर्जनान्यूज
परळी : माजी मंत्री धनंजय मुंडे परळीकडे परतताना मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या वाहनाचा अपघात झाला असून. यामध्ये त्यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. मुंडे यांनी काळजीचे कारण नसून, प्रकृती चांगली असल्याचं संदेश दिला.
मंगळवारी ( दि. ३ ) दिवसभर सर्व कार्यक्रम आटोपून परळी कडे येत होते. शहराजवळ मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व अपघात घडला. सुदैवाने यात गंभीर इजा झाली नाही. मा.मंत्री धनंजय मुंडे यांना छातीला किरकोळ मार लागला आहे. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला. धनंजय मुंडे यांनी ही तब्येत व्यवस्थित असून, काळजीचे कारण नाही. असा संदेश दिला आहे.