क्राईम
मासे पकडण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू:परळी तालुक्यातील घटना
लोकगर्जना न्यूज
परळी : मासे पकडण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा वाण नदी पात्रात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना पांगरी ( ता. परळी ) घडल्याचे आज सकाळी उघडकीस आले.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे शेषेराव पाचांगे ( वय ६५ वर्ष ) रा. पांगरी ( ता. परळी ) हे सोमवारी जाळे घेऊन मासे पकडण्यासाठी वाण नदीवर गेले. दरम्यान ते पाण्यात पडले बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची परळी ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. स्वतः पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढला. या घटनेने पांगरी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत शेषेराव पाचांगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.