माळेगाव येथे ठिबक सिंचन संच देखभाल-निगा मार्गदर्शन
माळेगाव : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन संच प्रशिक्षण व मार्गदर्शन मोहिमे अंतर्गत केज तालुक्यातील माळेगाव येथे शनिवारी(दि२२)कृषी विभाग केज आणि जैन इरिगेशन सिस्टीम ली. जळगाव चे अधिकृत वितरक श्री गणेश ट्रेडर्सचे संचालक गणेश चिरके यांच्या संयुक्त विद्यमाने ठिबक सिंचन संच देखभाल-निगा मार्गदर्शन व प्रशिक्षण पार पडले.
कमी पाण्यात जास्त उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सुक्ष्म ठिबक सिंचनाचा वापर केला जातो.या सूक्ष्मसिंचन पद्धतीत ठिबक संचाची कार्यक्षमता कायम राहण्यासाठी वेळोवेळी देखभाल करणे निगा राखणे आवश्यक आहे.जेणेकरून संचाची कार्यक्षमता कायम राहील आणि ठिबक संच जास्त काळ पूर्ण क्षमतेने राहिल्यास पाण्याची,खताची,मजुरांची,वेळेची,ऊर्जेची पर्यायाने पैशाची बचत होईल. यावेळी जैन इरिगेशन कंपनीचे व्यवस्थापक बी.बी. भोसले यांनी सूक्ष्म ठिबक सिंचनाचे महत्व पटवून सांगितले. जैन इरिगेशन कंपनीचे कृषी अभियंता सुरेश अवचार यांनी ठिबक सिंचनाचे तंत्र वापरण्याची पद्धत विशद केली.तर केज तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने हे अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की,शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सूक्ष्म ठिबकद्वारे पिकांना पाणी सोडण्याचा वापर करावा त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होईल.शासनाकडून ठिबक संचासाठी अनुदान देण्यात येत आहे याचाही शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमास जनविकास संस्थेचे रमेशराव भिसे, जेष्ठ नेते बालासाहेब बोराडे,माळेगावच्या सरपंच कौशल्या दाहातोंडे, साळेगावचे सरपंच कैलास पाटील,ग्रामसेवक शिवाजी पटाईत ,लिंबाराज सोनवणे, रूपेश बोरगावकर,गणेश चिरके,कृषी सहाय्यक उमेश माळी,आत्माचे योगेश पाटील,अंगद गव्हाणे, ,अमोल सोनवणे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.