माळेगाव येथे खंडोबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा
माळेगाव : केज तालुक्यातील माळेगाव येथे खंडोबा मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा कलशारोहन सोहळा रविवारी होणार आहे. त्यानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी दि १८ रोजी सकाळी ९ ते ३ नूतन खंडोबा मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.त्यानंतर रात्री ८ ते १२ या वेळेत शिवमल्हार जागरण पार्टी,सांगली यांचा वाघ्या मुरुळीचा जंगी कार्यक्रम होईल.
रविवारी दि १९ रोजी सकाळी होमयज्ञ,धार्मिक विधी महापूजा होईल त्यानंतर पंकजाताई मुंडे,बजरंग सोनवणे,रमेश आडसकर यांच्या शुभहस्ते खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा होईल.तर दुपारी ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री,आ.निमिता मुंदडा,गणेश महाराज जोगदंड यांच्या शुभहस्ते कलशारोहन होणार आहे.त्यांनतर नंगर तोडण्याचा कार्यक्रम होईल आणि ३ ते ७ या वेळेत महाप्रसादाच्या पंगती होतील. तर रात्री ९ ते ११ ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे हरिकीर्तन होणार आहे.भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन माळेगाव येथील नागरिकांनी केले आहे.