मादळमोही जि.प.उर्दु शाळेत अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा
मदळमोही : गेवराई तालुक्यातील मादळमोही जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेत आज ( दि. १८ ) सकाळी अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा केला. यावेळी अल्पसंख्यांकासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि हक्कांबद्दल मार्गदर्शन केले.
संयुक्त राष्ट्रानी 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत करण्यात आला़. त्यानुसार जगभर 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील जि. प. उर्दू प्रा. शाळा मदळमोही येथे आज जागतिक अल्पसंख्याक दिनाचे औचित्य साधून अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका रफत मॅडम ,प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी सहशिक्षक माजेद यांनी अल्पसंख्याकांनी आपल्याला दिलेल्या घटनात्मक तरतुदी,अधिकार,सुविधा याबाबत माहिती मिळवली पाहिजे,
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उत्कर्षासाठी झटले पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच ‘अल्पसंख्याकानी आपले हक्क, अधिकार समजून घ्यावे, समानतेच्या तत्वानुसार यांचा विकास होणे आवश्यक आहे. अखंडता व एकात्मता टिकून राहण्यासाठी त्यांची प्रगती होणे महत्त्वाचे आहे’ असे मत व्यक्त केले. सहशिक्षक सोहेल यांनी समारोप केला. तर आभार सय्यद रहीम यांनी मानले. याप्रसंगी सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.