मादळमोहीच्या लेकीचा एमबीबीएसला प्रवेश:जिल्हा परिषद शाळेकडून पालकाचा सत्कार
गेवराई : तालुक्यातील मादळमोही गावाची कु.पठाण आयेशा पटेल यांनी परिस्थितीवर मात करत NEET परीक्षा करुन पहिल्याच राउंड मध्ये आयेशाला शासकीय कोट्यातून बदनापूर (जालना) येथे MBBS ला प्रवेश मिळाला आहे.
याबद्दल उर्दू जिल्हा परिषद शाळेकडून आज गुरुवारी ( दि. १० ) सकाळी वडिलांचा सत्कार शाळेत करण्यात आला.
ग्रामीण भागात आजही मुलींच्या शिक्षणाची मोठी गळती आहे. शहरी भागातील मुलगी डॉक्टर होणे सोपे आहे. पण ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील मुलीच्या कष्टाचे मूल्य खूप मोठे आहे. विशेष म्हणजे पठाण आयेशा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उर्दू माध्यमातून झाले आहे. तरूण पिढीने व पालकांनी याचा आदर्श घ्यावा म्हणून जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, मादळमोही तर्फे पठाण आयेशा पटेल यांचे वडील मसूद पटेल यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेच्या मु.अ. शेख रफत बेगम, शिक्षक, माजेद , अजिम, सय्यद रहीम, सोहेल आफताब इतर महिला, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पठाण अतिक, सदस्य अमीर खान उपस्थित होते.