माणूसकीला काळिमा! मारहाण करत ७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; नराधम आरोपी अटक
लोकगर्जनान्यूज
गेवराई : शहरात माणूसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, शहरात रस्त्यावर फळ विकणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला नराधमाने जबर मारहाण करुन अत्याचार केल्याची घटना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी घटना उघडकीस येताच जिल्हा सुन्न झाला असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. सीसीटीव्हीच्या अधारे संशयित नराधमास अटक केली. ज्ञानेश्वर लक्ष्मण घुंबार्डे (वय ३१ रा.गेवराई) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील रहदारीच्या ठिकाणी एक ७० वर्षीय वृद्ध महिला फळ विकून आपला उदरनिर्वाह चालवते. ज्याठिकाणी फळ विक्रीसाठी गाडा लावलं जातं तिथेच रहातात. गुरुवारी ( दि. २९ ) पहाटे एका नराधमाने सर्व सीमा ओलांडून एकटी वृध्द महिला असल्याची संधी साधून प्रथम जबर मारहाण केली. यानंतर अत्याचार केले. सकाळी ही घटना उघडकीस येताच गेवराई शहरात व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध सुरू केला. घटना घडलेल्या परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली. एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी ज्ञानेश्वर लक्ष्मण घुंबार्डे यास पोलीसांनी अटक केली. पिडीत वृध्द महिलेवर दवाखान्यात उपचार सुरू आहे. या घटनेने बीड जिल्हा सुन्न झाला तर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.