माजी सैनिक बालासाहेब शेप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
रक्तदान, आरोग्य शिबिर व वृक्षारोपण असे उपक्रम राबविले
लोकगर्जना न्यूज
आडस : केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील माजी सैनिक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, आरोग्य शिबिर व वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांनी शेप यांना शुभेच्छा दिल्या.
देशसेवा करुन सेवानिवृत्त झाल्यानंतर ही बालासाहेब शेप हे गावाकडेही नियमित समाज उपयोगी उपक्रम राबवित आहेत. शेप यांचा गुरुवारी ( दि. १४ ) वाढदिवस होता. या निमित्ताने लाडेवडगाव येथे गुरुवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात सकाळी ११ ते सायंकाळी ५ असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आला. यावेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच डोळे तपासणी करण्यात आली. यामध्ये १५० जणांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. या सर्वांचे अंबाजोगाई येथे शासकीय दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन स्वारातीचे डीन डॉ. बास्कर खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. माणीक फड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, संजय गंभीरे, सुरेश कराड, गणपत मुंडे, जय जवान संघटनेचे पांडुरंग शेप, सेवानिवृत्त कॅप्टन पठाण उस्मान, सखाराम शेप, राहुल शिंदे, सुनील शेप, वैजनाथ लाड, विलास ढाकणे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना मंजूरी पत्र वाटप करण्यात आले. अनेकांनी बालासाहेब शेप यांचे अभिष्टचिंतन केले.