माजी विद्यार्थिनी कडून शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप;पाच वर्षांपासून राबविण्यात येतोय उपक्रम
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : तालुक्यातील घाटनांदूर येथील सोमेश्वर कन्या शाळेच्या माजी विद्यार्थिनींनी एकत्र येऊन यश दाईनी फाऊंडेशन उभे करून या माध्यमातून आपण शिकलेल्या शाळेतील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करतात. हे उपक्रम मागील ५ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. मुली व महिलांनी एकत्र येत हा पायंडा पाडला असून तो सर्वांना आदर्श घेण्यासारखा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
सोमेश्वर कन्या शाळेतील माजी विद्यार्थिनींचा सन २०१८ मध्ये मेळावा झाला. यावेळी शाळेतील अनेक आठवणी व अडचणींना उजाळा मिळाला. यातून आपण शाळा व विद्यार्थिनींसाठी काहीतरी करावं असं चर्चेतून समोर आले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दि.ना. फड यांनी शाळेतील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप करण्याचा उपक्रम राबविण्याचे सुचवले. यास होकार देत ४० माजी विद्यार्थिनी एकत्र आल्या यात शेतात मजुरी करणाऱ्याही महिला आहेत. त्यांनी यश दाईनी फाऊंडेशन हे नाव देऊन आपला उपक्रम सुरू केला. दरवर्षी या महिला जवळपास ६० हजार रुपये जमा करून शाळेतील गरजु व होतकरू विद्यार्थिनींना गणवेश अन् शैक्षणिक साहित्य वाटप करतात. हा कार्यक्रम आज सोमवारी ( दि. २४ ) सकाळी ११ वाजता शाळेत पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. सविता बुरांडे यांनी आम्ही आमच्या लहान बहिणींना मदत करत असून, तुम्ही यात सामील व्हा असे इतर माजी विद्यार्थिनींना आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनींना हे काम आज आम्ही करत असून उद्या तुम्हाला करायचं आहे असे प्रतिपादन केले. यावेळी सोमेशवर कन्या शाळेचे मुख्याध्यापक दि. ना. फड, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सवितताई जाधव, यश दाईनीच्या प्रा. सविता बुरांडे,अनिता पाटील,रंजना करे,, रंजना कराड,सिता काबरे, पत्रकार किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्ताविक मुख्याध्यापिका सविता जावध यांनी केले तर सुत्रसंचलन रितेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख ,संगेवार,नखाते , देशमुख जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पालक , विद्यार्थीनी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.