माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना घाटावर मोठा धक्का
बाजार समिती संचालकांसह कार्यकर्ते राष्ट्रवादीत
बीड : चौसाळा येथील, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे खंदे समर्थक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रमिलाबाई श्रीमंत सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक श्रीमंत साहेबराव सोनवणे, शिकूर मज्जीद सौदागर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना घाटावर मोठा धक्का बसला आहे.
चौसाळा येथील बीड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक प्रमिलाबाई श्रीमंत सोनवणे, माजी संचालक श्रीमंत साहेबराव सोनवणे, शिकूर मस्जिद सौदागर हे माजी मंत्री क्षीरसागरांच्या अतिशय जवळ असलेले कार्यकर्ते होते. परंतु आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून आपल्यासह अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या सर्वांनी गुरूवार (दि.१७) रोजी आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी या सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.