महिला शेतीचा कणा – कृषीभूषण विद्या रुद्राक्ष
कृषी संलग्न उद्योग स्थापन महिला शेतकरी मेळावा
लोकगर्जना न्यूज
आडस : पेरणीपूर्व मशागत व नंतरही शेतीतील म्हत्वाच्या कामांची जबाबदारी महिलांवर असल्याने महिला शेतीचा कणा आहे. शेती मालावर प्रक्रिया करून बचत गटाच्या माध्यमातून महिला शेती संलग्न उद्योग करु शकतात याबाबत कृषीभूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी विद्या रुद्राक्ष यांनी आडस येथे कृषी संजीवनी मोहिम अंतर्गत कृषी संलग्न उद्योग स्थापना व व्यवस्थापन महिला शेतकरी मेळाव्यात शुक्रवारी ( दि. १ ) कृषी दिनी मार्गदर्शन केले.
कृषी कार्यालय केज व लोककल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आडस यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून केज तालुक्यातील आडस येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत कृषी संलग्न उद्योग स्थापन व व्यवस्थापन या विषयावर महिला शेतकरी मेळावा महालिंगेश्वर मठ येथे शुक्रवारी ( दि. १ ) दुपारी पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला शेतकरी कृषीभूषण विद्या रुद्राक्ष, रोहिणी भरड ( कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान शास्त्रज्ञ) उपस्थित होत्या. यावेळी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विद्या रुद्राक्ष म्हणाल्या की, आवड व छंदातून महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करावी. आलेल्या संधीला न डावलता तीच्या वापरातून पुढे जाण्यासाठी धडपडत राहायचं. प्रेरणा देणारे खुप असतात पण आपल्यातील प्रेरणा आपण जागृत करून स्वतःच अस्तित्व घरात, समाजात निर्माण करायच. न थकता पुढेच चालत मनाला व मेंदूला नविन गोष्टी शिकताना टवटवीट ठेवायच.आपण सकारात्मक विचार केले की, तसेच मार्ग भेटत जातात. सतत नविन लोकांना भेटत राहून नविन ज्ञान आत्मसात करायच. जेजे चांगल तेवढ आत्मसात करायचं. या सोबतच मुलांकडे ही दुर्लक्ष होऊ नये मुल हीच आपली संपत्ती त्यांना वेळ द्यायचा त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करायचे व त्यांच्यावर चांगले संस्कार द्यावे. विविध विषयांवर मार्गदर्शन करुन या यशस्वी महिला शेतकरी विद्या रुद्राक्ष यांनी शेतकरी ते कृषीभूषण पुरस्कारापर्यंतचा संघर्ष महिलांसमोर व्यक्त केला. रोहिणी भरड यांनी शेत मालावर प्रक्रिया करून कशा स्वरूपात आपले उत्पन्न महिला वाढवू शकतात. बचतगटा अंतर्गत महिला शेतमालातून विविध पदार्था बनवून व्यवसाय उभा करून आर्थिकदृष्टय़ा सक्षम कशा बनू शकतात या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या मेळाव्याला बचत गटांच्या व शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उमेद संस्थेचे श्रीमान माले, सविता आकुसकर यांच्या सह आदिंची उपस्थिती होती. मेळाव्याचे प्रस्ताविक भाग्यश्री पतंगे ( कृषी सहायक, आडस) यांनी केले. संचालन व आभार सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिवरुद्र आकुसकर यांनी केले. अद्याप पर्यंत शेती विषयक मार्गदर्शन व मेळावे हे फक्त पुरुषांचेच होत असे परंतु यावेळी प्रथमच महिला शेतकऱ्यांचा मेळावा पार पडल्याने कृषी सहायक भाग्यश्री पतंगे आणि सुषमा आकुसकर यांचे आभार मानले जात आहे.