महिला वाहक अन् प्रवासी महिला बसस्थानकातच भिडल्या; हनामारीचा व्हिडिओ व्हायरल
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : महिला वाहक व महिला प्रवासी यांच्यात काहीतरी कारणावरुन वाद सुरू झाला. तो इतका विकोपाला गेला की, दोघींनीही इकदुसऱ्याच्या झिंज्या ओढत बसस्थानक परिसरातच मारहाण सुरू केली. हा प्रकार कोणीतरी कॅमेऱ्यात कैद करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
धारुर येथून अंबाजोगाई येथे जाणारी बस फलाटावर थांबलेली होती. या बसची महिला वाहक व प्रवासी महिलेत काहीतरी कारणावरुन वाद सुरू झाला. तो इतका विकोपाला गेला की, दोन्ही महिला बस मधून खाली उतरुन एकमेकींना भिडत मारहाण करु लागल्या, येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. चक्क बसस्थानक परिसरात हा प्रकार घडला असल्याने तालुकाभर याची चर्चा सुरू झाली. काही दिवसांपूर्वी याच तालुक्यातील शिक्षीका व खिचडी शिजवणाऱ्या महिलांचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
महिला वाहक व प्रवासी महिलेच्या मारहाणीचा व्हिडिओ कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला.
अंबाजोगाई बसला नेहमीच गर्दी
धारुर आगार वगळता दुसरी एकही बस अंबाजोगाई मार्गावर धावत नाही. मागील काही महिन्यांपासून अर्ध्या तास ऐवजी पावून तासाला अंबाजोगाई मार्गावर गाडी सोडण्यात येत आहे. ही वेळ केवळ कागदावर असून अनेक वेळा तास-दिडतास उशिराने गाडी सुटते. यामुळे अंबाजोगाई गाडीला नेहमीच गर्दी असते. या गर्दीमुळे असे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे.