क्राईम

महिलांनो सावधान! दागिने उजळून देतो म्हणून फसवणारी सक्रिय! असे भामटे गावात आलेतर पोलीसांना संपर्क करा- एपीआय शंकर वाघमोडे

 

केज : सोन्याचांदीचे दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने  वृद्ध महिलेचे १ लाख १५ हजारांचे दागिने भामट्यांनी लंपास करुन त्याऐवजी कागदात खडे बांधून दिल्याची घटना केज शहरात घडली आहे. यामुळे शहरात खळबळ माजली असून, ही टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत असल्याने महिलांनी सावध होण्याची गरज आहे. सोने उजळून अथवा पॉलीश करून देतो, स्वस्त सोन्याचांदीचे दागिने देतो असे आमिष दाखवीत असेल तर याला बळी न पडता पोलीसांना संपर्क करा असे आवाहन केज पोलीस ठाण्याचे प्रभारी शंकर वाघमोडे यांनी केले आहे.

कोण कसे फसवेल याचा नेम नसून त्यामुळे सजग रहाण्याची गरज आहे. अशीच काहीशी घटना गुरुवारी ( दि. १७ )फेब्रुवारी केज येथील समर्थनगर मध्ये घडली. दोघं भामटे गल्लीबोळात फिरत होते. यावेळी त्यांना जोशी यांच्या घराचे चॅनेल गेट उघडे दिसले. हे पाहून अनोळखी इसमानी रजनीबाई अनंत जोशी ( वय ७८ वर्ष) यांना तुमचे जुने सोन्याचे दागिने उजळून नव्या सारखे करून देतो असे म्हणून रजनीबाई जोशी यांचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठन, अडीच तोळे वजनाचे गंठन घेतले. हातचलाखी करून अदलाबदल करुन त्या भामट्यांनी एका पुडी जोशी यांच्या हातात देऊन निघुन गेले. ते दोघे अनोळखी इसम गेल्यानंतर रजनीबाई जोशी यांनी ती पुडी उघडून पहिली असता त्यात सोन्याच्या दागिन्याऐवजी खडे बांधून दिले. हे पहाता जोशी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन १ लाख १५ हजारांचे दोन अनोळखी इसमांनी फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात दोन आरोपींच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३/२०२२ भा.दं.वि. ३८० व ३४ नुसार गुन्हा दाखल केला.घटनेचा अधिक तपास एपीआय शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते करीत आहेत. तसेच कोणी सोन्याचांदीचे दागिने उजळून देतो, अथवा स्वस्त दरात देतो असे आमिष दाखवत असेल तर याला बळी न पडता जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करुन माहिती द्यावी असे आवाहन एपीआय शंकर वाघमोडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »