महिनाभराच्या विश्रांती नंतर सोयाबीन दरवाढ
दोन दिवसात वाढले क्विंटल मागे १५० रु.
लोकगर्जना न्यूज
सोयाबीन दरवाढ होईल म्हणून आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवले आहे. दर काही वाढत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनीही सोयाबीन काढले नाही. मध्यंतरी जवळपास तीन ते चार आठवडे सोयाबीन दर स्थिर होते, मागील आठवड्यात घसरण सुरू झाली. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची घालमेल सुरू होती. परंतु बुधवार, गुरुवार असे दोन दिवस दरवाढ झाली असून दोन दिवसात १५० रु. प्रतिक्विंटल प्रमाणे वाढले आहेत. ही वाढ तब्बल एक महिन्यानंतर झाली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मागील वर्षी सोयाबीन प्रतिक्विंटल ११ हजार रुपये पर्यंत गेले होते. हे दर पाहून शेतकऱ्यांचा कल सोयाबीन उत्पादनाकडे झुकलं, खरीप हंगामात कापसाची लागवड घटून सोयाबीनचे क्षेत्र वाढले. या हंगामातील हे प्रमुख पीक ठरले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पदरात सोयाबीन पडताच दर घसरण्यास सुरुवात झाली. नवीन सोयाबीन ७ हजारांपर्यंत बाजारात विकले जाऊ लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवाढ होईल म्हणून पुर्ण माल न विकता नड भागावी तेवढाच माल विकून बाकीचं घरातच साठवून ठेवले. परंतु दिवस जातील तसे दरवाढ होण्याऐवजी घसरण सुरू राहीली, ७ हजारावरुन सोयाबीन साडेसहा हजारांवर आले. यानंतर कमी होतं ६ हजार २०० ते ३०० वर स्थिर झाले. तब्बल महिनाभर हेच दर स्थिर होते. तरीही शेतकऱ्यांनी संयम राखून सोयाबीन न विकता साठवून ठेवणे पसंत केले. ६ हजार ३०० वरुन सोयाबीन घसरून चक्क ६ हजार ते ६ हजार ५० काही ठिकाणी सहा हजारांहून कमी झाले. त्यामुळे दरवाढीची वाट पहाणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीसं चिंतेचे वातावरण पसरले. परंतु दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढण्यास सुरुवात झाली. बुधवारी यामध्ये ५० रु. अशी किंचीत वाढ झाली. गुरुवारी यात १०० रु. अशी वाढ होऊन ६ हजार ५० वर पोचलेले सोयाबीन ६ हजार २०० पर्यंत गेले. दोन दिवसात प्रतिक्विंटल १५० अशी वाढ झाली आहे. ही वाढ तस या हंगामातील प्रथमच म्हणता येईल. परंतु मागील महिनाभराचा विचार करता या दरम्यान दर स्थिर होते. त्यानंतर घसरण झाली. यामुळे ही महिन्याभरानंतरची दरवाढ म्हणता येईल. आता दरवाढ सुरू झाली असल्याने सोयाबीन वाढणार की, आणखी कमी होणार याबाबत तज्ञ मंडळीचे काही मत समोर आले नाही. परंतु दरवाढ पाहून व मागील वर्षाचा अनुभव पहाता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.