
लोकगर्जना न्यूज
एक डॉक्टर व दुसरा शिक्षक असलेल्या दोन्ही सख्या भावांनी कुटुंबातील ९ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाले आहे. सदरील घटना सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे घडली आहे. प्रथम विष बाधेने मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते परंतु ही सामूहिक आत्महत्या असल्याची चर्चा आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर यामागील खरे कारण समोर येईल असे पोलीसांकडून सांगितले जात आहे.
डॉ. माणिक येलप्पा वानमोरे, अक्काताई वानमोरे, रेखा वानमोरे, प्रतिमा वानमोरे, आदित्य वानमोरे, शिक्षक पोपट येलप्पा वानमोरे, अर्चना वानमोरे, संगीता वानमोरे, शुभम वानमोरे सर्व रा. म्हैसाळ अंबिका नगर ( ता. मिरज जि. सांगली ) अशी मयतांची नावं आहेत. मयतांमध्ये दोन सख्खे भाऊ, आई व दोघांच्या पत्नी, मुलं-मुली अशा ९ जणांचा समावेश आहे. रविवारी ( दि. १९ ) यानी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे राज्यातील म्हत्वाच्या दैनिकांनी ई पेपरला वृत्त दिले आहे. तसेच हे कुटुंब मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होतं त्याचं नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचललं असावं असे सांगितले जात आहे. परंतु एकाच कुटुंबातील तब्बल ९ जणांनी मृत्यूला कवटाळल्याची वार्ता पसरताच सांगली जिल्हा हादरुन गेला आहे. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.