महाराष्ट्र सुन्न! ट्रॅव्हल्स अपघातात होरपळून 25 प्रवाशांचा मृत्यू;8 जन सुखरूप
लोकगर्जनान्यूज
नागपूर येथून पुणे येथे चाललेली खाजगी ट्रॅव्हल्सचा समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला. यावेळी गाडीला आग लागून 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. काचा फोडून बाहेर पडल्याने 8 प्रवासी वाचले आहेत. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाले असून हा मृत्यू महामार्ग करण्याआधी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
नागपूर येथून पुणे येथे प्रवासी घेऊन जात असलेली विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले. हे सर्व प्रवासी नागपूर, यवतमाळ, वर्धा येथील प्रवासी असल्याचे वृत्त आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सदरील बस बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखूंटा गावाजवळ समृध्दी महामार्गावर प्रथम बस एका खांबाला आदळली यानंतर दुभाजकावर आदळल्याने रॉड तुटून समोरील दोन्ही टायर निखळे यानंतर बस पलटी झाली. काही क्षणात आग लागली यामध्ये तब्बल 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. काही तरुण प्रवाशांनी काचा फोडून स्वतः व काही प्रवाशांना बाहेर काढले. यामुळे 8 जण वाचले आहेत.