महामंडळातून दहा लाखाची थेट कर्ज योजना सुरू करावी-सुरेश यादव
लोकगर्जनान्यूज
धारुर : राज्यातील सर्व महामंडळाच्या माध्यमातून दहा लक्ष रुपये थेट कर्ज लघु मध्यम उद्योग व्यवसाय सुरू करणे मागणीचे निवेदनपत्र 5 जाने 2024 रोजी मुख्यमंत्री सचिवालय यांना सुरेश यादव प्रदेश प्रमुख विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी दिले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये रोजगार स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी शासनाने स्थापन केलेल्या सामाजिक न्याय विभागांतर्गत चार महामंडळे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाअंतर्गत दोन महामंडळे उपकंपन्या मार्फत तीन महामंडळे तसेच नियोजन विभागा मार्फत एक महामंडळ अशा शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत सर्व महामंडळाच्या माध्यमातून उद्योगाकरिता महामंडळ व बँक असा संयुक्त कार्यक्रम राबवला जातो परंतु उद्योग व्यवसाय उभारणी करणाऱ्या व्यक्तीला अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. महामंडळाने मंजूर केलेले कर्ज प्रकरण बँकांच्या माध्यमातून असल्याने बँकांकडून लवकर निधी उपलब्ध होत नाही.लोकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते.म्हणून ओबीसी महामंडळ,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, महात्मा फुले महामंडळ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहीदास महामंडळ, पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर महामंडळ या सर्व महामंडळातून थेट कर्ज योजना सर्वच महामंडळाना लागू करून उद्योग व्यवसाय उभारले जावेत.लाभार्थीना जाचक अटी लाऊ नयेत, अध्यावत वेबसाईट प्रणालीचा वापर करण्यात यावा,कर्ज मंजुरी कालमर्यादा ठरवण्यात यावी.
थेट कर्ज योजना सुरू केल्यास सुशिक्षित बेरोजगार उद्योजक नव उद्योजक युवक महिला यांना व्यवसाय उभारणी साठी दिलासा मिळणार आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात छोटे मध्यम उद्योग उभारणी होऊन लोकांच्या हाताला काम व रोजगार उपलब्ध होणार असल्याने सरकारने त्वरित थेट कर्ज योजना लवकर सुरू करावी अशी मागणी सरकारकडे सुरेश यादव यांनी केली.