मराठा आरक्षण; आता सरकारला ‘या’ तारखेपर्यंतची जरांगे यांनी दिली वेळ
लोकगर्जनान्यूज
बीड : मराठा समाज लेकरांसाठी आरक्षण मागतोय पण शांत मराठ्यांना डाग लावण्याचं काम कोण करतंय, यापुढे जो मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलेल त्याला सुट्टी नाही. २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाचा इशारा बीड येथील आजच्या निर्णायक सभेतून सरकारला इशारा दिला.
मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर ही आरक्षणासाठी डेडलाईन दिली होती. परंतु यापुर्वी बीड येथे शनिवार ( दि. २३ ) निर्णायक इशारा सभा आयोजित करण्यात आली. या सभेसाठी बीड जिल्ह्यातून जनसागर लोटला होता. सभेला येण्यापूर्वी मनोज जरांगे यांची रॅली काढून तब्बल २०१ जेसीबी अन् हेलिकॉप्टर व्दारे पुष्पवृष्टी करुन जंगी स्वागत करण्यात आले. या सभेत जरांगे काय? बोलणार म्हणून राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता यवल्याचा बधीर,यडपट म्हणत सडकून टीका केली. तसेच मराठे आरक्षण कसं घेतात बघतच रहा म्हणत यांनीच सोयऱ्याचा हॉटेल जाळून मराठ्यांना डाग लावण्याचं काम केलं असा आरोप केला. शांततेत आंदोलन करा असे आवाहन करत शांततेत खूप ताकद असल्याचे म्हटले, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्यांना सुट्टी नाही असा इशारा दिला. तसेच येत्या २० जानेवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. यानंतर चर्चा बंद करण्याचा इशारा दिला. आता आरक्षणाशिवाय माघार नाही असा निर्वाणीचा इशारा देत २० तारखेच्या आत आरक्षणाची घोषणा करा जड जाईल असा इशारा दिला. समुदाय एकदा खवळला तर सुपडा साफ होईल. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करत २० जानेवारीच्या आत मराठा आरक्षण देण्याची मागणी केली. मराठा समाज मिळेल त्या वाहनाने सभास्थळी उपस्थित झाला.
मुस्लिम समाजाकडून सत्कार व पाठींबा
बीड येथील आयोजित निर्णायक इशारा सभेसाठी जाताना शहरातील बार्शी नाका भागात मुस्लिम समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.