मराठा आरक्षणासाठी केज तालुक्यातील या गावात दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू
लोकगर्जनान्यूज
केज : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळमअंबा ( ता. केज ) येथे तरुणाने गावात आमरण उपोषण सुरू केले. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी जवळपास १७ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा राज्यभरात अनेक गाव वस्ती, वाडी वर चक्का जाम, रस्ता रोको, उपोषण असे विविध आंदोलने सुरू आहेत. यापुर्वीच १० तारखेला कळमअंबा येथील सरपंच व तरुणांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र दिले. यानंतर बालासाहेब बाबासाहेब जगताप यांनी गावातील मंदिरामध्ये बुधवार ( दि. १३ ) पासून आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाला कळमअंबा येथील तरुण व ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला आहे. हे आंदोलन पहाता केज तालुक्यात मराठा आरक्षणासाठी समाज मोठ्या प्रमाणात लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी होत आहे.
खोडस येथे रस्ता रोको
मराठा आरक्षणासाठी खोडस ( ता. धारुर ) येथील मराठा समाजाने बुधवारी ( दि. १३ ) सकाळी आडस-धारुर रस्त्यावर खोडस पाटी येथे रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे रस्ता बंद असल्याने वाहतूक ठप्प झाली. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी या आडस व पिंपरी येथे थांबविण्यात आल्या होत्या.