आपला जिल्हा
मराठा आरक्षण;केज तालुक्यातील यागावातील मराठ्यांचा निर्णय; मनोज जरांगे पाटील हाच आमचा पक्ष
मनोज जरांगे पाटील यांचा गावकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
केज : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आनंदगाव येथे जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी निवडणुकीपर्यंत पूढार्यांना गाव बंदीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निश्चय करून तशी शपथही घेतली. मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही कोणत्याही पक्षाचे नाहीत असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यात आल्या.
कॉन्फरसिंगद्वारे पाटील म्हणाले हा लढा चालू ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.आरक्षणासाठी ठाम भूमिका घेऊन आपण सर्वजण लढत आहोत लवकरच मी आनंदगाव येथे भेट देणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जनजागृती फेरीला ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.