मयत पोलीस कुटुंबाला आर्थिक मदत; पंकज कुमावत यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

सोशल मिडीया ग्रुपवरील चर्चेवरुतून कुटुंबाला मिळाला आधार
केज : महाराष्ट्र पोलीस दलात १९९३ मध्ये बीड येथे भरती झालेल्या पोलीस हवालदार सुधाकर घोळवे बक्ल नंबर ११८१ यांच डिसेंबरमध्ये अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांच कुटुंब हे उघड्यावर येऊ नये म्हणून १९९३ च्या पोलीस बॅच सोशल मिडीयावर ग्रुप ॲडमिन अशोक नलावडे आणि खलील सय्यद यांनी सर्व सदस्यांशी चर्चा करून सुधाकर घोळवे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आव्हान केले. सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रतिसाद दिला. एक लाख सहा हजार सातशे रुपयांचा धनादेश दि.२५ फेब्रुवारी शुक्रवारी केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याहस्ते मयत पोलीस हवालदार सुधाकर घोळवे यांची पत्नी शारदाबाई घोळवे व त्यांचा मुलगा सुरज घोळवे यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी केजचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे,पोलीस हवालदार आसाराम नागरगोजे,जसवंत शेप,जाधव शिवाजी शिनगारे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
बीड जिल्हा हा सतत कर्तृत्वान अधिकाऱ्यांची कदर करणारा व कामाने गाजतो, उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्याला पोलीस अधीक्षक म्हणून १९९२ ला अशोक धिवरे यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील विविध ठीकाणी सुरु असलेल्या अवैध धंद्यावर बेधडक कार्यवाही करून अवैध धंदे चालकांची धांदल उडवून दिली होती. जिल्ह्यातील अनेक शाळा महाविद्यालयात पालक व शिक्षक हे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना काॅप्या पुरवत असल्याची त्यांना गुप्त माहिती होती.या काॅपी बहाद्दर विद्यार्थ्यांंचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन बीड जिल्ह्यातील दहावी बारावीच्या परीक्षा या काॅपी मुक्त होण्यासाठी बीडचे पोलीस अधिक्षक अशोक धिवरे यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व परीक्षा सेंटर वर स्वतःभेट देऊन सर्व परीक्षा या काॅपी मुक्त पार पाडून हुशार विद्यार्थ्यांना न्याय दिल्याने पोलीस अधीक्षक अशोक धिवरे यांचे पालक वर्गातून आभार मानले होते.पोलीस अधीक्षक अशोक धिवरे यांनी शासकीय नियमानुसार बीड येथे १९९३ या वर्षी पोलीसांची भरती प्रक्रिया राबवून २५० पोलीस कर्मचारी यांची नेमणूक केली. यामध्ये पोलीस बाॅय,अनुकंपा, सेवानिवृत्त सैनिक या सर्वांचा विचार करून ही पोलीस भरती प्रक्रिया राबवून अनेकांना न्याय मिळवून दिला होता. बीड जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचारी अशोक धिवरे सरांच आजही मोठ्या मनाने आभार मानतात. या १९९३ च्या पोलीस भरती मध्ये धारुर तालुक्यातील अंबेवडगांव येथील शेतकरी कुटुंबातील सुधाकर घोळवे हे पोलीस बक्ल नंबर ११८१ पदावर नियुक्त झाले होते.पोलीस हवालदार सुधाकर घोळवे यांच डिसेंबर २०२१ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांच कुटुंब हे उघड्यावर येऊ नये म्हणून १९९३ च्या पोलीस बॅच ग्रुप ॲडमिन अशोक नलावडे आणि खलील सय्यद यांनी ग्रुप सदस्य पो.ह.आसाराम नागरगोजे,शिवाजी शिनगारे,राम यादव,मधुकर रोडे,रमेश सानप, सिरसट नाना, सह अनेकांनी चर्चा करून सुधाकर घोळवे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी आपल्या स्वखुशीने १९९३च्या बॅच मधील वरीष्ठ पोलीस अधिकारी पो.नि.आसाराम चोरमले,रामेश्वर खनाळ,अशोक गिरी,गंगाधर गजगे हे वरीष्ठ पदावर गेले म्हणून त्यांनी मनाचा मोठे पणा दाखवून घोळवे कुटुंबाला भरघोस मदत केली. पोलीस सहकाऱ्यांनी फोन पे व बँक खात्याचा वापर करुन हा निधी एकत्र केला सर्वांच्या मदतीने जमा झालेले एक लाख सहा हजार सातशे रुपयांचा धनादेश शुक्रवार ( दि.२५ ) फेब्रुवारी केज पोलीस उपविभाग कार्यालयचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते मयत पोलीस हवालदार सुधाकर घोळवे यांची पत्नी शारदाबाई घोळवे व मुलगा सुरज घोळवे यांच्याकडे सुपूर्द केला.