मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य;सभा घेऊन विजयाचा गुलाल मुंबईत उधळणार
लोकगर्जनान्यूज
मनोज जरांगे पाटील यांनी मरठा आरक्षणासाठी काढलेल्या आरक्षण पायी वारीला यश मिळाले असून महाराष्ट्र शासनाने मध्यरात्रीच राजपत्र प्रकाशित केले. जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. ही मराठा समाजचा आनंदाचा व विजयाचा दिवस आहे. आज विजयी सभा घेऊन जरांगे पाटील मुंबईत गुलाल उधळणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या मराठा आंदोलनाचा वणवा अख्या राज्यात पोचला, आपलं सरल पण लेकरांबाळासाठी आरक्षण आवश्यक आहे ते मिळवण्यासाठी जरांगे यांनी पायात भिंगरी बांधून राज्य पिंजून काढले. अनेक ठिकाणी धरणे आंदोलन, रास्तारोको,बंद पुकारले परंतु याचा काहीच परिणाम शासनावर दिसला नाही. शेवटी आरक्षण नाहीतर मरण म्हणत २० जानेवारी सकाळी आंतरवली सराटी ते मुंबई अशी पायी आरक्षण वारी काढली. या वारीला मराठा समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसाला याची संख्या वाढत गेली. पुणे येथे मराठ्यांची तब्बल ७५ कि.मी.ची रांग पाहून शासनाला धडकी भरली. त्याच दिवशीपासून शासनाने पळापळ सुरु केली. लोणावळा येथे विजयी सभा होईल म्हणून मंत्री महोदयांनी शासनाच्या वतीने जाहीर केले होते. परंतु त्यात काही उणीवा अन् सगेसोयरे सह सर्व मराठा समाजाला आरक्षण ही जरांगे पाटलांची मागणी शेवट पर्यंत कायम होती. आरक्षण वारी मुंबईला पोचताच शुक्रवारी मध्यरात्री सर्व मागण्या मान्य करुन सगेसोयरे सह मराठा आरक्षणाचा राजपत्र प्रकाशित केले. से सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे आजचा दिवस हा मराठा समाजासाठी म्हत्वाचा ठरला आहे. ही वार्ता समजताच गावागावात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. जरांगे पाटील आजच सभा घेऊन विजयाचा गुलाल मुंबईत उधळणार आहेत.