मतदानासाठी गावाकडे येताना अपघात केज तालुक्यातील तरुण ठार
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील गावातील तरुण मतदानासाठी औरंगाबाद येथून दुचाकीवर येताना नेकनूर जवळ इनव्हा कार व दुचाकीची धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. सदरील तरुण आनंदगाव सारणी येथील आहे.
मयत श्रीकृष्ण अनिल गायकवाड रा. आनंदगाव सारणी हा तरुण औरंगाबाद येथून दुचाकी क्रमांक एम.एच. २० सी एक्स ११०२ वर उद्या ग्रामपंचायत निवडणूक असल्याने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत होता. दरम्यान तो मांजरसुंबा-नेकनूर मधील गवारी पाटी जवळ आला असता इनव्हा कार एम.एच. २० एल ७००९ धडक झाली. धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. तातडीने त्यास नेकनूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करुन मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही घटना आनंदगाव सारणी येथे समजताच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.