मंदिराला देणगी द्यावयाची….व्यापारी सोबत जाताच पुढं घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ

लोकगर्जनान्यूज
माजलगाव : शहरातील प्रसिद्ध व्यापारी मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडले. यापुर्वीच मंदिराबाहेर उभे असलेल्या दोघांनी आम्हाला मंगलनाथ मंदिराला देणगी द्यावयाची आहे. कोणाकडे द्यावी म्हणजे व्यापाऱ्याला नदीकाठी नेऊन मारहाण करुन गळ्यातील सोन्याची चैन व इतर काही साहित्य जबरदस्तीने काढून नेले. भर दिवसा घडलेल्या या घटनेने मात्र माजलगाव शहरासह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
उत्तम दगडोबा गडम हे नेहमी प्रमाणे सकाळी मारुतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आले. दर्शन घेऊन ते परत जाताना. मंदिराच्या बाहेर प्रतिक्षेत असलेल्या दोघांनी गडम यांना थांबवून आम्हाला मंगलनाथ मंदिराला देणगी द्यावयाची आहे. पण कोणाकडे द्यावी हे माहित नाही. तुम्ही सांगितलं तर बरं होईल म्हणून गडम यांना दुचाकीवर बसवून ते नदीकडे असलेल्या मंदिरच्या दिशेने निघाले. ठगांनी दुचाकी कदम देवी मंदिराकडे घेऊन गेले. या मंदिराजवळ आधीपासून दोघं बसलेले होते. या चौघांनी उत्तम गडम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन, अंगठ्या असा एकूण ९० ग्रामचा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन पोबारा केला. यानंतर गडम यांनी पोलीसांकडे धाव घेतली आहे.भर दिवसा ही घटना घडल्याने माजलगाव शहरात खळबळ माजली आहे.