मंगळवारी केज येथे गावरान अंबा प्रदर्शन; रोटरी क्लबचा उपक्रम
केज : ५ जून या पर्यावरण दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने मंगळवारी ( दि. ७ ) जून तालुका स्तरीय गावरान आंबे प्रदर्शन केज बसस्थानकासमोर सकाळी ९ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आले. यामध्ये केज तालुक्यातील चांगल्या प्रतीच्या गावरान अंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. यामाध्यमातून तालुक्यातील गोड व चांगल्या प्रतिच्या आंब्याच्या प्रचार,प्रसार सह चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा उद्देश आहे.
सध्या बाजारात गावरान आंब्या ऐवजी विविध प्रकारचे व परराज्यातील आंब्याची चलती आहे. यामध्ये पारंपरिक गावरान आंबा काहीसा मागे पडला आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केज रोटरी कडून तालुक्यातील गावनिहाय अत्यंत गोड, स्वादिष्ट व उत्तम प्रतीचे गावरान आंबे प्रजाती जतन व्हावी यासाठी प्रदर्शन आयोजित केले जाते. हा उपक्रम यावर्षी ही आयोजित करण्यात आला. या प्रदर्शनात भाग घेऊ इच्छिणाऱ्या आंबे उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी ( दि. ७ ) सकाळी ९ ते ११ यावेळेत आपले आंबे घेऊन प्रदर्शनात प्रत्यक्ष सहभागी व्हायचे आहे. पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट गावरान आंबे प्रजातीला पारितोषिक दिले जाईल. या स्पर्धेत केशर किंवा इतर संकरित जातींना सहभाग मिळणार नाही. केज तालुक्यातील जास्तीत जास्त गावरान आंबे उत्पादक प्रेमींनी या तालुका स्तरीय गावरान आंबे प्रदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष रो. बापूराव सिंगण, सचिव रो. अरुण अंजान, संस्थापक अध्यक्ष रो. हनुमंत भोसले, प्रोजेक्ट चेअरमन रो. श्रीरामव शेटे, रो. श्रीराम देशमुख, रो. श्रीमंत यादव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रो. विकास मिरगणे – 9422470710, रो. प्रवीण देशपांडे -9420031555, रो. महेश जाजू -9422741027, रो. धनराज पुरी -9422241988, रो.डी. एस.साखरे – 7588056233, रो. विजय जकेटीया – 9422244454, रो. प्रकाश कामाजी – 9860652454, रो. पशुपतीनाथ दांगट – 7744017999, रो.दत्तात्रय हंडीबाग – 9028349999,रो. अरुण नगरे – 9422485732 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही केज रोटरीच्या वतीने करण्यात आले आहे. संकरीत आंब्याची बाजारात चलती असताना या प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्कीच गावरान आंब्याला चांगली ओळख व बाजारपेठ मिळेल. तालुक्यातील गावरान आंबा प्रेमींना तालुक्यातील उत्कृष्ट गोड असे आंबे उपलब्ध होतील असे मत व्यक्त केले जात आहे.