भीषण अपघात; लातूर – अंबाजोगाई रस्त्यावरील बर्दापूर फाट्यावर कार ऊसाच्या ट्रॅलीखाली घुसून तीन ठार?
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूरकर पाटीवर काही वेळा पुर्वी भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॅलीखाली कार घुसली असून कारमधील तिघे ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बीड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या दोन पदरी रस्ता लागताच कार चालकाला समोरील ऊसाचा ट्रॅलीला रेडिएम नसल्याने ती न दिसल्यामुळे ट्रॅलीच्या खाली कार घुसल्याचा अंदाज आहे. या घडलेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की, कारची समोरील बाजू चेंदामेंदा झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मयतांची नाव व गाव अद्याप समजले नाही. येथून काही अंतरावर आणखी एक अपघात झाला असून त्यातील काही जण जखमी आहेत. हा मार्ग मात्र आता मृत्यू मार्ग ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.