भारतात कोरोना वरील कॅप्सूल लाँच
नवी दिल्ली : कोरोनाची गोळी म्हणजे अँटीव्हायरल औषध मोलनूपिरावीर भारतात लाँच करण्यात आली . ओमिक्रॉन व तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असताना ही समाधान कारक वृत्त आल्याने मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ पॅनेलने अलिकडेच आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी अँटीव्हायरल औषध मोलनुपिरावीरला मंजुरी दिली आहे . ही गोळी सौम्य ते मध्यम संसर्ग असलेल्या रुग्णांना या गोळीचा पाच दिवसांचा कोर्स घ्यावा लागले . या ५ दिवसांच्या कोर्ससाठी रुग्णांना १ हजार ३ ९९ रुपये मोजावे लागतील असे सांगितले जात आहे . मोलनुपिरावीर हे एक अँटीव्हायरल औषध आहे , जे विशिष्ट आरएनए व्हायरला आळा घालते. या गोळीचे उत्पादन करण्यासाठी टोरेंट , सिप्ला , सन फार्मा , डॉ . रेड्डीज , नॅटको , मायलॅन आणि हेटेरो यासारख्या अनेक फार्मा कंपन्यांची प्रक्रिया सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सिप्ला , सन फार्मा आणि डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज देखील येत्या आठवड्यांमध्ये मोलनुपिरावीर कॅप्सूल बाजारात आणतील , अशी अपेक्षा आहे . असे मटाने वृत्त दिले आहे.