प्रादेशिक
भारताचा स्वर हरवला; लता मंगेशकर यांचे निधन
मुंबई : भारत रत्न देशाची गानकोकीळा लता मंगेशकर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर येथे मागील २८ दिवसांपासून उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आज ( दि. ६ ) त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तला दीदींच्या जाण्याने देशाचा स्वर हरवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.