भररस्त्यात तरुणाचा खून
बीड : शहरात थरार उडवून देणारी घटना घडली . अज्ञात तीन ते चार जणाच्या टोळक्याने एका २४ वर्षीय तरुणावर सशस्त्र हल्ला चढवून तरुणावर तलवारीसह अन्य धारदार शस्त्राने वार केल्याने सदरील तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडला . त्याला उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेने शहरात खळबळ माजली.
शहरातील बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेसमोर आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास खासबाग भागात राहणारा शेख शाहिद शेख सत्तार ( वय २४ वर्ष ) या तरुणावर तीन ते चार तरुणांनी धारदार शस्त्राने वार केले . दिवसाढवळ्या सशस्त्र हल्लेखोरांनी तरुणावर सपासप वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला . त्याला उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले . हल्लेखोर कोण ? याचा शोध पोलीस घेत असून एका संशयीताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे . सदरची घटना का व कशासाठी घडली हे अद्याप समजू शकले नाही .