क्राईम

भरदिवसा बॅंक कर्मचाऱ्यास लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश: बीड एलसीबीने तिघांच्या मुसक्या आवळल्या

लोकगर्जना न्यूज

बीड : गेवराई जवळ आयडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्याला भरदिवसा लुटल्याची घटना ( दि. २६ ऑगस्ट ) सकाळी ११:३० च्या सुमारास घडली होती. याप्रकरणी तपास करून बीड एलसीबीने तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अवघ्या चार दिवसांत या प्रकरणाचा छडा लावण्यात आल्याने बीड पोलीस दलाचे कौतुक करण्यात येत आहे.

समजलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी ( दि. २६ ) आयडीएफसी बँकेचा कर्मचारी सुदर्शन शिवाजी आघाव हे पाचेगाव येथून महिला बचतगटांना दिलेल्या कर्जाचे हफ्ते वसुली करुन गेवराई कडे येत होते. दरम्यान सर्व्हिस रोडवर असताना पाठीमागून एक प्लसर गाडीवर दोघांनी तोंडावर काळा कपडा बांधलेले आले. चाकुचा धाक दाखवून सुदर्शन यांच्या जवळील ९५ हजार ६१० रु. रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाले. याप्रकरणी गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु भरदिवसा लुटीची घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. चोरट्यांचे हे आव्हान स्विकारुन एलसीबीने तपास सुरू केला. यावेळी हा गुन्हा बीड येथील आनंद सुंदर ससाणे रा. पंचशिल नगर याने त्याच्या साथिदारांच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली. तसेच हा संशयित सध्या त्याच्या घरासमोर उभा असल्याचे खात्रीलायक माहिती मिळताच एलसीबी पथकाने आनंद सुंदर ससाणे यास ताब्यात घेतले. तसेच त्याचे साथीदार आकाश प्रकाश धुताडमल रा. टाकळगाव ( ता. गेवराई ), आकिल इस्माईल शेख रा. आहेर वाहेगाव ( ता. गेवराई ) या तिघांसह इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. यासह आदी गुन्हे यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपासासाठी संशयित आरोपींना गेवराई पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका रोड रॉबरीचा तपास लावण्यात यश आले असले तरी आज आष्टी येथे भरदिवसा दुचाकीच्या डीक्कीतून तब्बल ३ लाख ८० हजार रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »