क्राईम

भरदिवसा बॅंकेच्या कर्मचाऱ्याला लुटलं; बीड जिल्ह्यातील घटना

लोकगर्जना न्यूज

बीड : महिला बचत गटांची रक्कम जमा करुन बीडला येत असलेल्या आयडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्याची पिशवी पाठीमागून आलेल्या अज्ञातांनी हिसकावून नेल्याची घटना आज सकाळी गेवराई – बीड महामार्गावर घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या चोरट्यांच्या शोधात पोलीस पथक मागावर गेले आहे.

बीड येथील आयडीएफसी बँकेच्या शाखेतील कर्मचारी सुदर्शन शिवाजी वाघ रा. माटेगाव ( ता. बीड ) हे नेहमी प्रमाणे पाचेगाव ( ता. गेवराई ) येथून महिला बचतगटांची रक्कम वसूल करून ती शाखेत भरण्यासाठी बीड येथे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येताना. गेवराई -बीड महामार्गावर पाडळसिंगी जवळ आले असता पाठीमागून एक दुचाकी आली. त्यावर दोघे जण होते. त्यांनी दुचाकी जवळ आणून पैशांची पिशवी हिसकावून घेऊन बीडच्या दिशेने धुम ठोकली. सदरील कर्मचाऱ्याने आरडाओरडा केली परंतु चोरटे तोपर्यंत पसार झाले. सदरील पिशवीत ९५ हजार ६१० इतकी रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती पोलीसांना देताच गेवराई पोलीस ठाण्याचे एपीआय प्रफुल्ल साबळे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. लवकरच चोरट्यांचे मुसक्या आवळल्या जातील असे विश्वास व्यक्त केला. परंतु भरदिवसा व महामार्गावर लुटीची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »