भरदिवसा फिल्मी स्टाईल चोरीच्या घटनेने अंबाजोगाईत खळबळ

अंबाजोगाई : येथील सराफा व्यापाऱ्याने रात्री दुकान बंद करून गेल्यावर शटरच्या कुलुप मध्ये अज्ञातांनी फेवीक्विक व वाळू टाकली. सकाळी दुकान उघडण्यासाठी व्यापारी आला परंतु कुलुप उघडत नसल्याने ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात किल्ल्या बनवून देणाऱ्या कडे गेले. किल्ल्या बनविणाऱ्याला बोलत असताना स्कुटी कडे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी स्कुटी व डिक्कीत असलेल्या दागिन्यांच्या पिशवी सह पोबारा केला. भरदिवसा सकाळी १ वाजता शहरातील सर्वाधिक रहदारीच्या ठिकाणी चोरीची घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे.
राहुल राठोड यांचे शहरातील गुरूवार पेठेत सोन्या चांदीचे दुकान आहे. ते सोमवारी ( दि. ७ ) सकाळी दुकान उघडण्यासाठी आले, परंतु कुलुप उघडत नव्हते. यानंतर कुलुप उघडून घेण्यासाठी किल्ल्या बनविणाऱ्या कडे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले. बाजुला स्कुटी लावून बोलत असताना अज्ञात चोरट्याने स्कुटी घेऊन पोबारा केला. स्कुटीच्या डिक्कीमध्ये लाखोंचे दागिने असल्याचे सांगितले जात आहे. सुत्रांच्या माहिती नुसार रविवारी ( दि. ६ ) रठोड दुकान बंद करून गेल्यावर कोणीतरी दुकानाच्या शटरच्या कुलुप मध्ये फिवीक्वीक व वाळू टाकली आहे. त्यामुळे कुलुप उघडत नव्हते. हा प्रकार पहाता ही चोरीची घटना पुर्वनियोजित आहे का? असा संशय व्यक्त केला जात आहे. चोरी करणारी व कुलुपामध्ये वाळू व फिवीक्वीक टाकणारी व्यक्ती एकच आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. परंतु भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने अंबाजोगाई शहरात एकच खळबळ माजली आहे.